बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने आज शहर परिसरात पथ संचलन (रूट मार्च) काढला. नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष घालण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा शहर व ग्रामीण पोलिसांसह धामणगाव बढे व बोराखेडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग होता.शिवाय या पथसंचलनात सीआरपीएफ दलाची कंपनी, आंध्रप्रदेश येथील एस आय एफ कंपनी पथसंचलनात सहभागी झाली होती.दरम्यान
मतदान शांततेत होण्यासाठी पोलीस विभागाकडून दक्षता घेतली जात आहे.