देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव)विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी प्रसिद्ध झाला असून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी मतदान यंत्र सिलिंगच्या कामकाजासाठी श्री. परमेश्वर राठोड, महसूल सेवक तहसील कार्यालय देऊळगाव राजा यांचा आदेश निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार श्री राठोड हे निवडणूक कर्तव्यावर हजर राहणे अपेक्षित होते परंतु ते उक्त नमूद दिनांकास कार्यालयाला कोणतीही पूर्व सूचना न देता गैरहजर राहिले असल्यामुळे तसेच त्यांना भ्रमणध्वनी वरून वारंवार संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही यावरून त्यांनी निवडणूक कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे दिसून आल्यामुळे मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशाने आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी निलंबित करण्यात आले आहे.
श्री राठोड यांनी निवडणूक विषयक अत्यंत महत्वाच्या कामकाजात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा आणि कसूर केल्याचे सकृतदर्षनी निदर्शनास आले असल्याने व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक ) नियम 1979 चे नियम 3 चा भंग केलेला आहे आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1979 चे नियम क्रमांक 4 अन्वये श्री राठोड यांना या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येत आहे.सदर निलंबन कालावधीमध्ये श्री राठोड यांचे तहसील कार्यालय देऊळगाव राजा हेच मुख्यालय असेल.














