देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) कापूस वेचून झाल्यानंतर घरी पोहोचवणारे वाहन उभे असताना, वाहनाच्या बाजूला उभी असलेल्या शेतमजूर महिलेला रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो जीपने उडविल्याने शेतमजूर महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही दुर्दैवी घटना 12 नोव्हेंबर रोजी दगडवाडी शिवारातील पंकज लॉन्स जवळ संध्याकाळी घडली.याप्रकरणीएम एच 28 bq 29 81 ची बोलेरो जीप क्रमांक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कापूस वेचण्याचा सीजन आहे.अनेक शेतमजुरांना शेतमालक वाहनाने शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी आणतात आणि सोडतात.फिर्यादी नौशाद अली शौकत अली राहणार खळेगाव तालुका लोणार यांनी पिकप या वाहनात गावातील शेतमजूर महिलांना डोईफोडेवाडी येथील शेतकरी यांच्या शेतातील कापूस वेचण्यासाठी घेऊन आले होते.दिवसभर शेतमजूर महिलांनी कापूस वेचला व संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सदर शेतमजूर महिला पिकप वाहनात बसत असताना त्यातील सौ वंदना अनिल साठे ही महिला गाडीच्या बाजूला उभी असताना चिखली कडून येणारी पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप क्रमांक एम एच 28 बी क्यू 29 81 च्या चालकाने गाडी निष्काळजीपणे चालवून सौ वंदना हिला जोरदार धडक मारल्याने ती गंभीर जखमी झाली.या जखमी महिलेला तात्काळ एम एच 28 बीबी 31 10 मध्ये टाकून उपचारार्थ डॉक्टर शिंदे देऊळगाव राजा येथील दवाखान्यात आणले असता डॉक्टर शिंदे यांनी तिला मृत घोषित केले आहे.दरम्यान या प्रकरणी आरोपी बोलेरो चालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.