spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! जय ‘श्री’ साठी हवाच पालटली! -मुस्लिम समाज पेटवणार बुलढाण्यात ‘मशाल!’ -चिखलीत ‘पंजा’ हात उंचावणार तर सिंदखेडराजात ‘तुतारी’गुंजणार! -ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मुफ्ती सज्जाद नोमानी यांचा मविआ ला पाठींबा !

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके (बुलढाणा), राहुल बोंद्रे (चिखली), डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) यांना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मुफ्ती सज्जाद नोमानी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.मुफ्ती सज्जाद नोमानी यांच्या विचार व तत्वावर मुस्लिम समाज चालतोय त्यामुळे त्यांच्या कोअर कमिटीने निर्णय घेतल्या प्रमाणे बुलढाण्यात जयश्रीताईंची मशाल पेटणार असून चिखलीत पंजा व्रजमूठ आवळणार तर सिंदखेडराजा येथे तुतारीचा स्वर गुंजण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मुस्लिम समाज बांधवांचे समर्थन असल्याची पक्की खबर आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रमात महायुती विरोधात महाविकास आघाडी ताकतीने उतरली आहे. बुलढाण्यात महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली तर चिखलीत महाविकास आघाडीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा प्रचारात आघाडी दिसून येत आहे. तसेच सिंदखेडराजात डॉ.राजेंद्र शिंगणे यांची बाजू बळकट आहे.या तिन्ही उमेदवारांसह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता मुस्लिम समाजाचे पाठबळ मिळणार आहे.मुस्लिम समाजाचे मुफती सज्जाद नोमानी यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघ करिता जयश्रीताई शेळके,राहुल बोंद्रे चिखली,डॉ. राजेंद्र शिंगणे,
सिंदखेडराजा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.संपूर्ण मुस्लिम समाज एक मताने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला समर्थन देणार असल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितल्या जात आहे. मुफती सज्जाद नोमानी हे मुस्लिम समाजाचे मुख्य मौलाना आहेत.मुफती सज्जाद नोमानी यांच्या विचार व तत्वावर मुस्लिम समाज चालते.
विशेष म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मुफ्ती सज्जाद नोमानी आहेत.समाजातील लोकच नव्हे तर मशिदीचे विद्वान आणि मौलानाही त्यांचे लक्षपूर्वक ऐकतात.कारण ते मनापासून असे निर्णय घेत नाहीत, उलट यावर अनेक शोहरा समितीच्या बैठका होतात. (कोअर कमिटी) अभ्यासक एकत्र बसून चर्चा करतात. सर्व घटकांचा विचार करून पुराव्याच्या आधारे निर्णय घेतला जातो आणि संपूर्ण राज्यातील तालुके व जिल्ह्यातील मशिदींमध्ये हा निर्णय जाहीर केला जातो. त्यामुळे संपूर्ण समाजातील लोक प्रभावित होऊन त्यांची मते ऐकली जातात व त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीकडे हवा पालटल्याचे चित्र आहे.

‘हॅलो बुलडाणा कडून दिलगिरी!

आम्ही चुकून मुफ्ती सज्जाद नोमानी यांना जमीयत उलेमा ए-हिंद-चे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला होता परंतु मुफ्ती सज्जाद नोमानी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष आहेत.आम्ही जमीयत उलेमा ए-हिंद कडे ‘हॅलो बुलडाणा’ कडून दिलगिरी व्यक्त करतोय!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!