चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने दि.१२ नोव्हेंबर रोजी बोधेगाव ला भेट देऊन राहूल बोंद्रे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. भेटी दरम्यान ग्रामस्थांनी दर्शवलेला उत्साह आणि आत्मीयतेने केलेले स्वागत त्यांच्या विजयाचे सुचक आहे. ग्रामस्थांशी चर्चा करताना शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा उल्लेख केला.
सोयाबीनचे घसरलेले भाव, शेतीमालाला कमी मिळणाऱ्या किमती, आणि महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यांचा विशेष उल्लेख होता.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याचे वचन दिले आहे. कर्जमाफी, शेतमालाला न्याय्य दर, आणि तरुणांना रोजगाराच्या संधी यांची हमी ही केवळ घोषणाच नाही, तर ती आमची बांधिलकी आहे, जी आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असेही राहूल बोंद्रे यांनी सांगितले.
मौजे जांब येथे भेट दिली असता आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले. या दौर्यादरम्यान गावकऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी, मजूर, व्यापारी, आणि युवकांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतीमालाला योग्य दर, रोजगाराच्या संधी, आणि मूलभूत सुविधांवरील तुटवडे हे मुद्दे प्रामुख्याने मांडले. महाविकास आघाडी नेहमी गावकऱ्यांच्या सोबत उभी असून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढा देणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही एकत्र येऊन हा परिवर्तनाचा मार्ग प्रशस्त करूया!याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. या वेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने कुलमखेड गावाला भेट दिली. येथील मतदारांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा ऐकल्या. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लोकांनी राज्यातील सध्याच्या सरकारविषयी नाराजी दर्शवली असून, बदलाची मागणी वाढत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील विजयाची खात्री व्यक्त होत आहे. या भेटीत पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे एकता आणि सामर्थ्याचे दर्शन झाले.या प्रचार दौऱ्यामध्ये शिवसेना उबाठा चे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, रिजवान सौदागर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.