बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा मतदारसंघातील आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कन्यांनी मतदारसंघातील गावोगावी भव्य रॅली काढत प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. त्यांच्या या प्रचार दौऱ्याला गावकऱ्यांचा आणि विशेषतः माता-भगिनींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आमदार संजुभाऊ गायकवाड यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत वरवंड, डोंगरखंडाळा, ईजलापूर, मढ, गुम्मी, तराडखेड, जनुना या गावांमध्ये सौं. रोहिणी मयूर बाहेकर, सौं. वैष्णवी अनिकेत शेवाळे, सौं. नेहा शेषराव काटकर, कीर्तीमाला गजानन खडसे, सौं. स्वाती आशिष जाधव, सौं. उज्वला राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रचार दौऱ्यात शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, मढ येथील चक्रधर स्वामी आश्रमाच्यावतीने आमदार संजुभाऊ गायकवाड यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रत्येक गावात गावकऱ्यांनी आमदार गायकवाड यांचे स्वागत केले आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली.