बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी धावण्यासाठी बुलडाणा ते संभाजीनगर महामार्गावरील कोलवड येथील वाहतूक वळविण्यात आली आहे.
जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया दि. 19 जून ते दि. 3 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. 1600 व 800 मीटर धावण्यासाठी कोलवड येथील जाधव पेट्रोलपंपाजवळील रस्ता निश्चित करण्यात आला आहे. सदर मार्गावर वाहतूक सुरू राहिल्यास भरतीप्रक्रिया राबविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी ठिकाणावरून वळविण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी परवानगी दिली आहे.