बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माजी मंत्री एकनाथ खडसे अर्थात नाथाभाऊ यांच्या शब्दाला मोठे वजन आहे!त्यांच्या एका शब्दाला हजारो कार्यकर्ते पत्थर की लकीर मानतात.त्यांचा आदेश शिरोधार्य मानला जातो. आता नाथा भाऊंनी महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना विधानसभा निवडणुकीत मताधिक्यांनी निवडून आणण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे घाटाखालील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.सध्या जोरदार प्रचार सुरू असून माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पक्षनेते एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीच्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या मशाल या निशाणीला निवडून आणण्याचे आवाहन केले आहे.ते म्हणाले की,जयश्रीताई शेळके समाजात नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहतात.त्यांना सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील जाणीव असल्याने त्या जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करतील.बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत रेटतील.आणि विकास घडवू आणतील.त्यामुळे अशा कर्तुत्ववान जयश्रीताई शेळके यांना मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.