बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अजित पवार यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांना जिल्हा बँकेसाठी 300 कोटी तर 1900 कोटी रुपये विकास कामासाठी दिले.परंतु खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची वृत्ती असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.छगन भुजबळ हे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून पुन्हा शरद पवार गटात घर वापसी करून अजित पवार गटात मला सहन होत नसल्याचे कारण पुढे केले होते. यावर छगन भुजबळांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,अजित पवार यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांना जिल्हा बँकेसाठी 300 कोटी तर 1900 कोटी रुपये विकासकामासाठी दिले.शिंगणे यांचा गुदमरलेला श्वास अजितदादांनी मोकळा केला.ते जिकडे जातात तिकडे त्यांच्या बाजूने बोलतात. स्वतःला शिकलेले म्हणवतात. मागे शरद पवार यांनी एका महिन्यातच शिंगणे यांना बाजूला करावा लागलं होतं.परंतु खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची वृत्ती आहे,असेही छगन भुजबळ म्हणाले.