बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मशाल हाती घेतलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान जनतेचा प्रचंड उत्साह विजयाचा विश्वास देणारा ठरत आहे.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे तर ‘मशालीला’ निवडून आणण्याची जय्यत तयारी दिसून आली.
बुलढाणा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
मतदारसंघातील कोपरा न् कोपरा जयश्रीताई शेळके पायाला भिंगरी लावून पिंजून काढताहेत.विशेष म्हणजे त्यांच्या पदयात्रेला प्रचंड उत्साह दिसून येत असल्याने त्यांची प्रचार यात्रा विजयाचा हुंकार भरताना दिसते. जयश्रीताई शेळके यांनी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे भव्य पदयात्रा काढली.त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला.या भेटीगाठीत लोकांचा प्रचंड उत्साह दिसून आला.’यंदा मशाल निवडून आणायचीच आहे !’ असा विश्वास जनतेने प्रचार यात्रेतील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे व्यक्त केला आहे.