चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांचा प्रचारासाठी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे दि. १० नोव्हेंबर रोजी चिखली येथील प्रचार कार्यालयाला भेट दिली व उपस्थितांना संबोधित केले . महायुती सरकार च्या ध्येय धोरणाचा समाचार घेताना त्यांनी भाजपाने साम, दाम, दंडाचा कसा वापर केला तसेच देशात कशाप्रकारे अराजकता पसरली आहे हे ही सांगितले. राहूल बोंद्रे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी फटाके राखून ठेवा असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आपल्या भाषणात बोलताना प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या आडून लोकांच्या,महिलांच्या मतांना विकत घेण्याची विकृत मानसिकता ही भाजपाची आहे.हे राजकारणासाठी स्वत:च्या स्वार्थासाठी महाराष्ट्राची पातळी खाली आणता आहेत. आपण पाहता आहात आज या ठिकाणी महालक्ष्मी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आपण राजमाता जिजाऊ माॅ साहेब, अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आहे. त्याच्या प्रेरणेने आज आम्ही राजकीय श्रेत्रात कार्य करतो आहोत. त्याच्या विचारांचा वारसा चालवणा-या मायमाऊल्यांना लाडकी बहीण योजना तीही निवडणूकांना समोर ठेवून अक्षरश: लाच देण्याचा लाजीरवाणा प्रकार या पुरोगामी महाराष्ट्रात करण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केले आहे.
आपण जाणता आहात की, चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांनी आजपर्यंत लोकहिताच्या केलेली कामे, जनमानसाच्या समस्यांना प्राधान्य देण्यात राहूल बोंद्रे नेहमी आघाडीवर असतात. अशा सक्षम उमेदवारांस आपण बहुमताने विजयी कराल याचा सार्थ विश्वास मला वाटतो.चिखली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या विजयासाठी प्रणिती शिंदे यांची प्रचारसभेने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार रेखाताई खेडेकर, एडवोकेट वृषालीताई बोंद्रे,माजी नगराध्यक्षा प्रियाताई बोन्द्रे, जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई खेडेकर, माजी नगराध्यक्षा शोभाताई सवडतकर, विद्याताई खड़सन, संगीता गाडेकर, विद्याताई देशमाने, प्रमिलाताई जाधव , नरुभाऊ खेडेकर, संदीप मनरोला, हाजी दादू सेठ, नीलेश गावंडे, कुणाल बोन्द्रे, श्रीराम झोरे, नंदुभाऊ सवडतकर, सचिन बोन्द्रे, अथरोद्दीन काज़ी, नीलेश अंजनकर, आसिफ भाई, रफीक सेठ,
यांच्या सह समस्त महिला कांग्रेस, महिला शिवसेना, महिला राष्ट्रवादी पदाधिकारी व हिरकनी प्रतिष्ठानच्या समस्त संचालिका उपस्थित होत्या.