8.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

आजच्या पोलीस भरतीत काय झाले? – उमेदवारांची सोय अजिंक्य मंगल कार्यालयात..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यभरात पोलिसांची भरती सुरू झाली आहे. भरतीच्या दुसऱ्या दिवशी 500 उमेदवारांची मैदानी चाचणी पहाटेच घेण्यात आली. यामध्ये 262 उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले. उमेदवारांची राहण्याची व्यवस्था अजिंक्य मंगल कार्यालयात करण्यात आली आहे. उमेदवारांना दररोज केळी, बिस्किटे तथा मेडिकल सुविधा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुलढाण्यात तब्बल 133 जागांसाठी 10,236 अर्ज प्राप्त झाले आहे. मैदानी चाचणी करिता सुरुवातीच्या दोन दिवस प्रतिदिन 500 याप्रमाणे उमेदवार बोलविण्यात आले असून उर्वरित दिवशी देखील उमेदवार बोलाविण्यात आलेले आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदनिहाय प्रमाणे पोलीस शिपाई- १२५ पदे ( ३८ पदे महिलाकरीता व उर्वरित ८७ पदे पुरुष सर्वसाधारण) उमेदवारांकरीता
आहे व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन ) – ०८ (०२ महिला व ०६ पुरुष सर्वसाधारण) पदे
अशी एकुण १३३ रिक्त पदांची पदभरती दिनांक १९/०६/२०२४ते दि. ०३/०७/२०२४पर्यंत एकुण १३ दिवसाच्या कालावधीमध्ये शारिरीक मोजमाप चाचणी/मैदानी चाचणी / कागदपत्र पडताळणीबाबतची प्रक्रियेची कार्यवाही पोलीस कवायत मैदान, पोलीसमुख्यालय बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेली आहे.सदर पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई पदाकरीता ८५३१ व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन)
पदाकरीता १७०५ असे एकुण १०२३६ आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. मैदानी चाचणी करीता सुरुवातीचे २ दिवस प्रतिदीन ५०० या प्रमाणे उमेदवार बोलविण्यात आले असुन उर्वरित दिवशी ८०० उमेदवारांना बोलाविण्यात आलेले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!