spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ताईंची गावोगावी धगधगतेय मशाल ! -मोताळा येथे धडाक्यात प्रचार !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आपली सत्ता यावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरेंनी जिल्ह्यात सभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडवून दिला तर आज महाविकास आघाडीच्या व उबाठा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी गावोगावी प्रचारार्थ भेट देवून मशाल धगधगत ठेवण्याची साद घातली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग
फुंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी गावोगावी भेटीगाठी वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे उत्साह संचारला आहे.शिवाय गावोगावी प्रचाराचा जोर वाढू लागला आहे.
आज जयश्री सुनिल शेळके यांनी बोराखेडी, अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती ता. मोताळा या गावात प्रचारार्थ भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांसोबत हितगुज साधले.या प्रसंगी गावकऱ्यांनी उस्फुर्त पाठींबा दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!