बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे राजकारणाचा स्तर पुरता घसरल्याचे चित्र असून,राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध त्यांच्याच पुतणी गायत्री शिंगणे ह्या विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे येथे राजकारण तापले असून गायत्री शिंगणे यांच्या प्रचाराचे एक-दोन ठिकाणी लावलेले बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याचे समोर आले आहे.
राजकारणात आरोप प्रत्यारोप चालतात. उमेदवारी मागे घेण्यासाठी कटकारस्थान रचले जाते.विकासाचा मुद्दा सोडून राजकारण गुद्द्यावरही येते.मात्र सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात आता जोरदार प्रचाराचे शक्तीप्रदर्शन सुरू असून,प्रचाराचे बॅनर सुद्धा फाडल्या जात असल्याची घटना समोर आली आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात काट्याची लढत आहे ती म्हणजे डॉ.राजेंद्र शिंगणे विरुद्ध गायत्री शिंगणे यांची! तसे पाहिले तर काका विरुद्ध पुतणी अशी ही लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदार संघ हा मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. गायत्रींचा स्वभाव मतदारसंघाला माहित आहे.
सहानुभूती , धडाडीपणा, वक्तृत्व आणि विशेष म्हणजे मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा गोतावळा ! परंतु
राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर या दोघांनाही कंटाळलेली मतदारसंघातील जनता कोणालाही निवडून आणेल ही येणारी वेळ सांगू शकते? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीमागे असणारे अनेक नेते गायत्री शिंगणे यांच्या संपर्कात आहेत.प्रत्येक जाती धर्माच्या लोकांकडून, नेत्यांकडून गायत्री शिंगणे यांना पाठिंबा मिळत आहे. वंजारी समाज,बंजारा समाज, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी आणि जनतेने गायत्री ताईंना पाठिंबा दिलाय त्यामुळे ही चूरस रंगणार असून येणारी वेळ ही विजयाचा शंखनाद करणार आहे.दरम्यान गायत्री ताई शिंगणे यांच्या प्रचाराचे बॅनर फाडण्यात आल्याने अज्ञात समाजकंटका विरुद्ध असंतोष पसरला असून,हे घाणेरडे राजकारण थांबण्याची गरज निर्माण झाली आहे.