बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे शहरात चोरीचे प्रमाण एवढे वाढले की चक्क पोलीस वसाहतीत देखील चोरी होत आहे. एका चोरट्याने दोन अल्पवयीन मुलासोबत जवळपास तीन लाखांचे प्लंबिंगचे साहित्य चोरून भंगारवाल्याला विकले. या चोरट्यांसह भंगारवाला देखील गजाआड झाला आहे. त्यामुळे ‘भंगारो के अंबरसा लगता है.. मेरा स्वामी’.. अशी रटणारी त्याची बायको आता नशिबाला दोष देत आहे.
पोलीस सूत्रानुसार, बुलढाणा शहरातील पोलीस वसाहतीमध्ये 100 क्वार्टर्स आहेत. येथे पोलीस देखील डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असतात. परंतु संतोष मोरे नामक चोरट्याने दोन अल्पवयीन मुलांसोबत जवळपास तीन लाखांचे प्लंबिंग साहित्य चोरून नेले. हे साहित्य एका भंगारवाल्याला विकले आहे. या आरोपी भंगारवाल्याचे नाव हाफिज खान वजीर खान असे आहे. आणि यापूर्वी चोरीचा माल विकत घेतल्याचे निष्पन्न होत असून पोलीस अधिक शोध घेत आहे. या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.