spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – निवडणूक कामावर दांडी;निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा दांडीबहाद्दरांना इशारा!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अनुषंगाने 22-बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आज 8 नोव्हेंबर 2024 रोजी बुलढाण्यातील सहकार विद्या मंदिर, चिखली रोड येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. परंतु, एकूण 11 मतदान अधिकारी आणि कर्मचारी या महत्त्वाच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिल्याचे आढळले आहे. या कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शरद पाटील यांच्या आदेशानुसार, कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीसमध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अंतर्गत कलम 134 च्या अन्वये गैरहजेरीमुळे कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा मागविण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेप्रती हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देत, निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी त्यांच्या भूमिकेचे गांभीर्य स्पष्ट केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!