चिखली (हॅलो बुलडाणा) भाजपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरूवात केली आहे. या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ७ नोव्हेंबर रोजी रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधील दौऱ्यात पांगरी, साखळी खुर्द, केसापूर, माळवंडी, दुधा, चिखला, घाटनांद्रा, ढासाळवाडी, पळसखेड आणि रायपूर या गावांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
श्वेताताईंनी आपल्या पहिल्या टर्ममध्येच विकास कार्यासाठी प्रचंड निधी खेचून आणला आहे. महायुती सरकार येण्यापूर्वी अडीच वर्षे निधी मिळण्यात अडचण आली असली तरी, मागील अडीच वर्षांत हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून त्यांनी शहर आणि ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसह विविध पायाभूत सुविधा रायपूर सर्कलमध्ये निर्माण करण्याचे श्वेताताईंचे प्रयत्न गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरले आहेत. या व्यापक विकासकामांमुळे आगामी निवडणुकीत श्वेताताईंना मोठा मताधिक्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.