spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! बुलढाण्यात आज धडाडणार शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरेंची तोफ: मतदारसंघात जयश्रीताई शेळकेंचे वादळ होणार तयार!

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्या प्रतिष्ठेची बाब करणाऱ्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ आज शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी बुलढाणा नगरीत धडाडणार आहे. या तोफांच्या माऱ्यात विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जाण्याची चिन्हे आहेत. अभूतपूर्व ठरणाऱ्या या जंगी जाहीर प्रचार सभेमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचे वादळ तयार होणार आहे.

बुलढाणा मलकापूर राज्य महामार्गावरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील विशाल मैदानात आज 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही अभूतपूर्व प्रचार सभा लावण्यात आली आहे. गद्धाराना गाडण्यासाठी आणि बुलढाण्यातून हद्धपार करण्याचा दृढ निर्धार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
तसेच कोणत्याही परिस्थितीत बुलढाण्यात मशाल जिंकानारच असा चंग शिवसैनिकांनी बांधलाय. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिकांनी तसा निर्धार केला आहे. या निर्धाराला अनुसरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा दिली आहे.बुलढाण्यातील या प्रचार सभेत त्यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख शिलेदार,नेते उपनेते हजर राहणार आहे. ही सभा विक्रमी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे नेते राहुल भाऊ बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ ,एडवोकेट गणेश पाटील, सुनील सपकाळ, प्राध्यापक डी एस लहाने, नरेश शेळके, लखन गाडेकर, यांच्यासह बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील समस्त पदाधिकारी, तालुका प्रमुख, उप प्रमुख, शहर आणि विभाग प्रमुख यांच्यासह बुलढाणा विधानसभा मतदार संघातील हजारो शिवसैनिक, मावळे जीवाचे रान करीत आहे. शिवसेना व आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचा झंझावाती प्रचार करण्यात आला. मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील जाहीर सभा विक्रमी व्हावी यासाठी परिश्रम घेत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!