चिखली (हॅलो बुलडाणा) मतदार संघातील उदयनगर (उंद्री) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते स्व.अजय बिडवे (अज्जूभाऊ) यांनी आपल्या कार्यकाळात हजारो लोकांसाठी अहोरात्र काम केले. त्यांच्यामुळे अनेकांनी मोठी घरं,बंगले उभारले, फोर व्हीलरमध्ये फिरण्याची क्षमता मिळवली. अज्जू भाऊंच्या मेहनतीने अनेकांचे व्यवसाय आणि संस्था उभ्या राहिल्या. स्व.अज्जू भाऊंनी चिखली मतदारसंघात विस्तारक म्हणून काम करत संघाची कार्यप्रणाली समाजात रुजवली.दुर्दैवाने त्यांचा अपघातात मृत्यू झाल्यावर, ज्यांच्यासाठी त्यांनी इतके समर्पणाने काम केले, त्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विसर घेतला. अज्जू भाऊंनी ज्या व्यक्तींना आपली बहिण मानले, त्याच व्यक्तींनी त्यांच्या प्रति असलेली निष्ठा बाजूला ठेवली. त्यांचा परिवार आज संघर्षातून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे.अज्जू भाऊंनी दिलेल्या योगदानामुळे अनेकांचे जीवन सुधारले, पण त्यांच्या परिवाराला अपेक्षित मदत मिळालेली नाही. समाजाकडून मात्र अज्जू भाऊंच्या कार्याची आणि त्यांच्या परिवाराच्या संघर्षाची दखल घेण्याची अपेक्षा आज संपली आहे.