spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स! “श्वेताताईंना मत म्हणजे भ्रष्टाचार मुक्त विकास” – प्रकाश महाराज जवंजाळ

चिखली (हॅलो बुलडाणा) सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये उन्नती घडवणारा खराखुरा विकास म्हणजे काय असतो या त्याचा अनुभव चिखली मतदारसंघातील जनतेने या अडीच वर्षात श्वेताताई महाले यांच्या धडाकेबाज विकासकार्यातून घेतला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चिखली शहर आणि ग्रामीण भागात जात, धर्म, पक्ष कसलाही भेदभाव न करता भ्रष्टाचार मुक्त विकास हेच ध्येय ठेवून आ. श्वेताताई महाले यांनी कार्य केले. त्याची परतफेड म्हणून श्वेताताईंना मतांनी विजयी करा, कारण श्वेताताईंना मत म्हणजेच भ्रष्टाचार मुक्त विकासाला मत होय असे प्रतिपादन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. दि. ६ नोव्हेंबर रोजी इसोली येथे आयोजित प्रचार सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, परिपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ दि. ६ नोव्हेंबर रोजी आयोजित गाव भेट दौऱ्यादरम्यान इसोली येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी या दौऱ्याचा समारोप इसोली येथील सभेने झाला. आ. श्वेताताई महाले यांच्यासह प्रकाश महाराज जवंजाळ, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई आणि भाजपा अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेख अनीस यांची या सभेमध्ये भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन सरपंच माणिकराव खरात यांनी केले तर प्राचार्य समाधान शेळके यांनी आभार मानले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!