शेतकरी नेते श्री सदाभाऊ खोत यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे यांनी केली आहे.रयत क्रांती संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सदाभाऊंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्यासाठी आग्रही आहेत.
रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा व महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते तथा शेतकरी नेते श्री सदाभाऊ खोत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीमध्ये निष्ठेने काम केले व महायुतीतील अनेक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री धैर्यशील माने यांना २०१९ व २०२४ या दोन्ही लोकसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये सदाभाऊ खोत यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मोठा शेतकरी वर्ग हा श्री सदाभाऊ खोत यांचा चाहता आहे शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून सदाभाऊ खोत हे महायुतीचे व महायुतीच्या सरकारची कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील रयत क्रांती संघटनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग यांची सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपदावर पाहण्याची इच्छा व उत्सुकता आहे याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे व माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आदरणीय सदाभाऊंना मंत्रिमंडळात विस्तारामध्ये स्थान देण्याबाबत विनंती केली आहे व निश्चितपणे एका शेतकरी नेत्याला महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये मंत्रीपदावर बसवून माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या व सर्व रयत क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील हीच अपेक्षा.