बुलढाणा:- महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोल्या जिल्ह्यात दौऱ्यावर असताना त्यांनी ओबीसी समाजाच्या आपल्याच कार्यकर्त्याच्या हातून स्वतःचे चिखलाने माखलेले पाय धुवून घेतल्याचा प्रकार सोशल मीडिया सह सर्वत्र व्हायरल झाला. या घटनेचा भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर निषेध व्यक्त केल्या जात आहे. बुलढाणा येथे सुद्धा आज दि.१९ जून २०२४ रोजी भाजपा नेते मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाच्या वतीने स्थानिक वसंतरावजी नाईक चौकात निदर्शने करून नाना पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला काळ्या फुल्या मारत तसेच काँग्रेस व नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.”नाना पटोलेंचा हा प्रकार म्हणजे काँग्रेसी प्रवृत्तीच्या हुकूमशाहीचे लक्षण आहे. ओबीसी समाजाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला अशा प्रकारे चिखलाने माखलेले पाय धुवावयास लावणे हा अतिशय असभ्य व निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.”
यानंतर महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई चिकटकर यांनीही तीव्र शब्दात या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
या निषेध आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख, बुलढाणा तालुका अध्यक्ष मोहन पवार, मोताळा तालुका अध्यक्ष गजानन घोंगडे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई चेकटकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत, भाजयुमो नेते योगेशसिंग राजपूत, भाजपा कामगारा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, भाजपा महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर, सौ अलकाताई पाठक, सौ शोभाताई ढवळे, भाजपा महिला शहर अध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर, तालुका सरचिटणीस सतीश देहाडराय, अनंता शिंदे, प्रदीप सोनटक्के वैभव लाड, ईश्वरसिंग राजपूत, पवन बगाडे, सुदर्शन कांबळे, श्री गीते यांसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते