बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजकारणात काय बदल घडेल हे कोणी सांगू शकत नाही!यंदा परिवर्तनाची लाट असल्याचे मतदार सांगताहेत.विशेषता शिवसेना शिंदे गटाचे डॉ संजय रायमुलकर यांचे देऊळ पाण्यात असल्याचे एकंदर चित्र दिसून येत आहे.कारण येथे उबाठा शिवसेनाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात यांना अधिक पसंती दिसून येत असून यंदाच्या निवडणुकीत निश्चितच परिवर्तनाची लाट उसळणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.
मंत्रालयीन सचिव असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊननिवडणूक लढविण्याचा पवित्र घेतला.या निर्णयाचे बेकरातील मतदारांनी स्वागत केले आहे. रखडलेल्या विकासाचा अनुशेष भरून प्रत्येक क्षेत्रातील विकास करणार असल्याचे अभिवचन खरात यांनी मतदारांना दिले आहे.दरम्यान खरात यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय रायमुलकर यांना सन 2009 मध्ये 91457 मते मिळाली होती. त्यावेळी त्यांना टक्कर देणारे राष्ट्रवादीचे एडवोकेट साहेबराव सरदार यांना 58,380 मते मिळाली होती. त्यांचा पराभव झाला.त्यानंतर 2014 मध्ये शिवसेना पुढे राहिली.परंतु यंदा परिवर्तन निश्चित होईल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला असून खरात यांचे समर्थक कामाला लागले आहेत.केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव संजय रायमुलकर यांच्यासाठी प्रयत्न करीत असले तरी,विजयाचा झेंडा सिद्धार्थ खरात फडकवणार असल्याचा राजकीय अंदाज आहे.