बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विकास काय असतो? आणि शांतप्रिय मतदारसंघ कसा असते? यासाठी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यंदा मैदान मारणार असून तशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्यात.सोशल मीडियावर नव्हे तर गावोगावी जयश्रीताईंचा जय जयकार होत असून,ताईंच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य दिसून येत आहे.
मोताळा तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मोताळा तालुक्यातील गावात प्रचार दौरा संपन्न झाला. खांडवा, बाम्हंदा, किन्होळा, थड, रोहिणखेड, सोनबरड या गावातील प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांशी संवाद साधुन मशाल या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व भगिनी तसेच गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान मशालीचा लखलखाट करण्यासाठी मतदारराजा एकवटला असल्याचे चित्र दिसून आले.