मलकापूर (हॅलो बुलडाणा /रविंद्र गव्हाळे) मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे एका व्यापाऱ्याचे पैसे इलेक्शन ड्युटीने पकडल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतमालाची हराशी थांबवली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या विक्रीत होणारा अडथळा आणि नुकसान पाहून रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन बेलाड फाटा, हायवे नंबर 6 या ठिकाणी सुरु असून, शेतकऱ्यांनी मार्ग बंद केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.