spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ‘पाचशे रुपये रोज पाहिजे तर प्रचाराला या!’ -भाडोत्री कार्यकर्त्यांची रणधुमाळीत चंगळ ! -प्रचारफे-यांसाठी कार्यकर्ते गोळा करताना उमेदवारांची दमछाक!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सध्या प्रचाराचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी कार्यकर्ते जमा करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. याचा फायदा घेत काही जणांनी भाडोत्री कार्यकर्ते उपलब्ध करून देण्याचा धंदाच सुरू केला असून, 500 रुपये रोज मिळत असल्याने भाडोत्री कार्यकर्त्यांची रणधुमाळीत चंगळ होत असल्याचे चित्र आहे.शक्ती प्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांची मागणी जास्त असल्याने रोजंदारीत कमालीची वाढ झाली आहे.

उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यात मुकादमासह भाडोत्री कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ झाली.आताप्रचाराचा धुराळा उडाल्याने रात्रीच्या जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. काही उमेदवारांनी जवळच्या विश्वासू कार्यकर्त्यांकडे त्याचे नियोजन सोपवले आहे.
मोटारसायकल असलेला कार्यकर्ता असेल, तर पेट्रोलच्या खर्चासह 500 रुपयांवर भाव फुटला आहे. अशा वाहनधारक कार्यकर्त्यांचा वापर विविध उमेदवारांच्या प्रचारफेरीसाठी केला जातोय. तथापि, यासंदर्भात गोपनीयता बाळगली जातेय. जमलेली गर्दी उत्स्फूर्त असल्याचे भासवले जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!