बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका पठ्ठ्याने शेतात चक्क गांजाची लागवड केली आणि पोलिसांना त्याला अटक करीत तब्बल 4 कोटी 51 लाख 11 हजार रुपयांचा 4505 किलो गांजा जप्तीची कारवाई केली आहे.एक आरोपी फरार असून जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी कारवाई समजल्या जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हद्दीतील ग्राम भिंगारा येथील शेत शिवारामध्ये आरोपी हिरालाल मांगीलाल वास्कले रा. भिंगारा याने गांजा लावलेला होता. दरम्यान
जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. विश्व पानसरे, अपोअ. श्री. अशोक थोरात, श्री. बी.बी.
महामुनी यांनी सदर कार्यवाहीसाठी आदेशीत केले होते. पोनि.श्री. श्रीकांत निचळ पो.स्टे. जळगांव जामोद यांनी अधिनस्त पोलीस
अधिकारी व अंमलदार पथक मिळून पो.स्टे. जळगांव जामोद हद्दीतील ग्राम भिंगारा शेत शिवारामध्ये 5 नोव्हेंबर रोजी गांजा अंमली पदार्थ उत्पादन, सावठवणूक व विक्री संबंधाने कार्यवाही करुन, एका आरोपीस पकडले. सदर प्रकरणात, पो.स्टे. जळगांव जामोद येथे अप.क्र. 627/2024 कलम 20 अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ अधिनियम (N.D.P.S.) सह कलम 3(5) BNS प्रमाणे दाखल आहे.