बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या वाढल्या आहेत. शहरामध्ये चोरांचा शिरकाव होत असून नागरिकात दहशत पसरत आहे. 17 जून रोजी वावरे लेआउट येथून आठ हजार किमतीचे लोखंडी गेट चोरीला गेले. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. अजय राजेंद्र बारवाल वावरे लेआउट मध्ये राहतात. ते पुणे येथे शिकायला आहेत. त्यांच्या घराच्या बाजूला खाली प्लॉटमध्ये दोन क्विंटल वजनाचे लोखंडी गेट ठेवलेले होते. परंतु रात्री अज्ञात भुरट्या चोरट्याने हे लोखंडी गेट चोरून नेले. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्याला दिली आहे. यापूर्वी देखील वावरे लेआउट मध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषता भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून पोलिसांनी पेट्रोलिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 Hellobuldana Hellobuldana
 
 




 

