मेहकर (हॅलो बुलडाणा) आज सकाळी मेहकरचे ग्रामदैवत श्री शारंगधर बालाजीचे दर्शन घेतले, त्यांच्या चरणी माथा टेकवून ही लढाई लढण्याचे बळ मागितले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे जाऊन त्यांनी महामानवास वंदन केले, तसेच पुढे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामनवांच्या चरणी खरात नतमस्तक झाले. नंतर पंचपीर बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. शेवटी श्री संत गजानन महाराज यांच्या तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेऊन, महाविकास आघाडीच्या मान्यवर नेत्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून, गावभेट आणि परिवर्तन दौरा सुरू करण्यात आला
याप्रसंगी सिद्धार्थ खरात यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, काँग्रेसचे विधानसभा नेते ॲड. अनंत वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दत्ता घनवट, तालुका अध्यक्ष काँग्रेस देवानंद पवार, मा. जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर बोरे, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नाजिमभाऊ कुरेशी, नारायण बळी, संजय वडतकर, वसंतराव देशमुख, ॲड. विजय मोरे, शैलेश बावस्कर, ॲड. गजानन लांडगे, सुखदेव ढाकरके, भागवत बोरकर, विनायक राव टाले, सतीश ताजने, छोटू गवळी, युनूस पटेल, रमजान चौधरी, बाबू परसुवाले तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.