बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांना या निवडणुकीत कमालीची कसरत करावी लागणार आहे. गत पंधरा वर्षात न सुटलेला पाणी प्रश्न व भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्या अंगलट येणार असल्याची चिन्ह आहेत.
लोकसभा निवडणुकीत मेहकर विधानसभा मतदारसंघात काठावरची ठरली. या निवडणुकीत शिंदेसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव यांना अवघे 273 मतांचे मताधिक्य मिळाले होते.परिणामी 2009 पासून सलग तीन वेळा येथून आमदारकी भूषविणाऱ्या संजय रायमुलकर यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही कठीण ठरणार असल्याचे दिसून येत आहे.’गद्दारी विरुद्ध खुद्दारी’ अशी भूमिका घेऊन उद्धवसेनेने येथीलनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
उद्धवसेनेकडूनही येथे विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदेसेने अंतर्गत धुसफूस सुरु आहे हे स्पष्ट असून रायमुलकरांसाठी हे अंतर्गत राजकारण धोक्याचे समजले जात आहे, यासोबतच मतदारसंघातील विकासकामांच्या अनेक मुद्द्यांवर जनसामान्यांमध्ये असंतोष ठरु लागला आहे. शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षात असतानाही आंदोलन केले होते. त्यानंतर खरेच हा भ्रष्टाचार निघाला का? याची पुढे काही वाच्यता झाली नाही. 379 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात आणि काही कोटींची वाढ केल्या गेली; पण हा विकास आराखडा कागदावरच आहे.
गंमत म्हणजे 2009 पासून न्यायालयात
हा विषय आहे. लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धन समितीवर लोकप्रतिनिधी म्हणून रायमुलकर होते. नुसत्याच बैठका झाल्या. आउटपुट शून्य. शेवटी न्यायालयालाच हस्तक्षेप
करून राज्य शासनाला लोणार विकास आराखड्यासाठी नव्याने सूचना द्याव्या लागल्या. आता हेच म्हणतात, तो न्यायालयाचा विषय आहे. आपण हस्तक्षेप करू शकत नाही; परंतु ज्या काळात यांच्या हातात सूत्रे होती, तेव्हा नुसत्याच बैठका घेऊन खुर्च्या उबवल्या जात होत्या की काय? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.लोणार शहराला सध्याही 15 ते 20 दिवसांआड पाणीपुरवठा होतो; पण येथील पाण्याचा प्रश्न 15 वर्षांत सुटला
नसल्याचे चित्र मतदारसंघात आहे.त्यामुळे डॉक्टर संजय रायमुलकर यांना यंदाची निवडणूक धोक्याची घंटा देत आहे.