spot_img
spot_img

💥 Exclusive खऱ्या लढतीचे संकेत दुपारी 3 च्या ठोक्यावर ! -सेटलमेंटचे राजकारण झाले का? कोण-कोण उमेदवारी मागे घेणार? -नामांकन मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून,कोण कोणते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार ? या प्रश्नाचे उत्तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत मिळणार आहे.शिवाय कोणत्या उमेदवाराने सेटलमेंटचे राजकारण केले हे देखील लक्षात येईलच!

खरे तर आज पासून विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झालीय. विविध घटना घडामोडी या विधानसभेच्या मैदानात दिसून येत आहे. विधानसभेची रंगत ही खऱ्या अर्थाने आज बघायला मिळणार आहे. याला कारणही तसेच आहे. आतापर्यंत विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले मात्र आज 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे बंड करणारे उमेदवार आज कोणता निर्णय घेतात याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आणि त्यानंतर चिन्हाचे वाटप होणार आहे. विविध मतदार संघामध्ये कहानी में ट्विस्ट बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र त्यासोबतच बुलढाण्याचे भाजप नेते विजयराज शिंदे यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मैत्रीपूर्वक लढतीची मागणी केली असल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे मात्र आता विजयराज शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? का निवडणूक लढवणार? असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी सुद्धा चिखली विधानसभेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे यांनी आपला अर्ज हा जर कायम ठेवला तर संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. विजयराज शिंदे यांनी जर अर्ज मागे घेतला तर कुणाल गायकवाड सुद्धा आपला अर्ज मागे घेणार असे या आधीच संजय गायकवाड यांनी सांगितले होते. तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघात सुद्धा असेच चित्र दिसून आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळालेली आहे. मात्र त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसचे नेते लक्ष्मण घुमरे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा खरात यांना अडचणी निर्माण होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ खरात हे लक्ष्मण घुमरे व बच्छीरे यांची समजूत कशी काढणार हा सुद्धा महत्त्वाचा विषय ठरला. त्यामुळे दुपारपर्यंत या ठिकाणी सुद्धा काय चित्र निर्माण होते याकडे सुद्धा जिल्हा वासियांचे लक्ष लागलेले आहे. सिंदखेडराजा व मलकापूर विधानसभा मतदारसंघात असेच चित्र निर्माण झाले आहे. महायुतीचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांना सिंदखेडराजा मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे मात्र मित्रपक्ष अजित पवार गट यांच्याकडून मनोज कायंदे यांना एबी फॉर्म मिळालेला आहे. एकाला माघार घ्यावा लागणार का मैत्रीपूर्वक लढत होणार हे आज दुपारपर्यंत कळणार. मलकापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडी कडून राजेशे ऐकडे यांना उमेदवारी मिळाली आहे मात्र त्या ठिकाणी हरिष रावळ उमेदवारी अर्ज दाखल केला.आज दुपारपर्यंत जिल्ह्याचे चित्र काय असणार हे स्पष्ट होणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!