बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार एडवोकेट शंकर चव्हाण यांच्यावर काल रात्री हल्लेखोरांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांनी चव्हाण यांची आज भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस केली असता,त्या हल्ल्याशी बोंद्रे यांचा काही संबंध नसून भाजप समर्थकांनी या प्रकारची पोस्ट व्हायरल केल्याचे म्हटले असून चिखलीतील घाणेरड्या राजकारणाचा राहुल बोंद्रे यांनी देखील निषेध व्यक्त केला आहे. शिवाय खिलाडी वृत्तीने निवडणूक लढा.. निवडणूक घाणेरड्या राजकारणाने जिंकता येत नाही असा सल्ला देखील बोंद्रे यांनी दिला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार एडवोकेट शंकर चव्हाण यांच्यावर 25 ते 30 हल्लेखोराच्या टोळक्यांने प्राण घातक हल्ला करून त्यांना जिवानिशी मारण्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री घडला होता.दरम्यानएका खाजगी दवाखान्यात चव्हाण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत.त्यांच्यावर लाठीकाठी लोखंडी रोड व तलवारीने हल्ला झाला असून त्यांच्या हातावर व डोक्यावर मार आहे.दरम्यान भाजप समर्थकांनी या घटनेची पोस्ट व्हायरल करून राहुल बोंद्रे यांना बदनाम करण्याचा घाट घातला होता.परंतु दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार नाहीत ते राहुल बोंद्रे कसले ? त्यांनी चव्हाण यांची दवाखान्यात जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना देखील केली.यावेळी चव्हाण यांनी सांगितले की,तुम्ही मैदानातील तगडे खिलाडी आहात.आणि प्रतिस्पर्धी असलो तरी माझे मित्रही आहात.चव्हाण म्हणाले की, एका मित्राने मला सांगितले राहुल बोंद्रे यांना बदनाम करण्यासाठी भाजप समर्थकांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे.तसेच राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले की,चिखलीत घाणेरड्या राजकारणाचा मी निषेध करीत असून घाणेरडे राजकारण करून कोणी जिंकून येऊ शकत नाही.त्यासाठी खिलाडी वृत्तीने निवडणूक लढवावी असे बोंद्रे यांनी याप्रकरणी टोला लगावला.