(हॅलो बुलडाणा) खामगाव येथील जेष्ठ पत्रकार किशोरकाका रुपारेल हे मागील ३५ वर्षापासुन पत्रकारीता करीत असून मेनरोडवरील सनी टॉवर्स येथील कार्यालयातुन मागील १४ वर्षापासुन सांज दैनिक लोकोपचार प्रकाशित होत आहे. युगधर्म पब्लिक स्कूल या संस्थेबाबत सांज दैनिक लोकोपचार वृत्त पत्रामध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या कारणावरून त्यांच्या कार्यालयात घुसून काही महिला पुरुषांनी धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी तक्रारीवरुन पोलिसांनी १० ते १२ जणांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.. संपादक किशोर रुपारेल हे मेनरोड वरील सांज दैनिक लोकोपचार कार्यालयात पेपरड्राप करीत असतांना अचानक सौ.मंगला महाजन प्राचार्या युगधर्म पब्लीक स्कूल सजनपूरी या त्यांच्या १० ते १२ महिला व पुरुष सहकाऱ्यांना घेवून सांज.दैनिक लोकोपचारच्या कार्यालयात आल्या त्यांनी “तुम्ही आमच्या शाळेचे संचालक गोपाल अग्रवाल यांच्याबाबत बातमी कशी काय लावली, त्या बातमीत छळ झालेल्या महिलेचे नाव का नाही छापले, तुमची आमच्या शाळेबाबत व संचालकांबाबत बातमी छापायची हिम्मत कशी झाली, असे जोरजोराने धमकावत त्यांनी यानंतर जर गोपाल अग्रवाल व युगधर्म पब्लीक स्कूलबाबत बातमी लावाल तर याद राखा” अशा धमक्या देवून ते लोक रुपारेल यांच्या अंगावर धावून आले होते..यावेळी काका रुपारेल यांनी शहर पोलीस स्टेशनला फोन केला असता पोलीस येत असल्याने धमक्या देवून ते लोक निघून गेले. गोपाल अग्रवाल यानेच या लोकांना चिथावणी देवून रुपारेल यांच्या कार्यालयात पाठविले, असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे.. या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गोपाल बाबुलाल अग्रवाल, प्राचार्या सौ.मंगला महाजन यांच्यासह १० ते १२ जणांविरुध्द महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संरक्षक हिंसा आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे असून आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे..