बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे हे वारंवार सिद्ध होत आहे.आज सकाळी देखील याच महामार्गावर ट्रक आणि इंडिगो कार ची धडक होऊन या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाल्याची बातमी समोर आली आहे.तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली.
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या सुमारास सिंदखेडराजा नजिक पिंपळखुटा जवळ हा अपघात झालाय. पुण्याहून अमरावतीला जातांना धावत्या ट्रकला इंडिगो कारची धडक लागून हा अपघात झाल्याचं समोर आलंय.अपघातात एका कुटुंबातील आई-वडील व मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी बचावल्याचे सांगण्यात येत आहे.