spot_img
spot_img

भेसळयुक्त मिठाई ग्राहकांच्या घशात ?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईला मागणी वाढते. त्याचा गैरफायदा घेत, व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त वा बनावट खव्यापासून बनविलेली मिठाई ग्राहकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतो.बाजारात असलेली शुद्ध मिठाईची कोणतीही शाश्‍वती नाही.शिवाय स्टॉलवरील व मिठाईच्या दुकानावरील मिठाईवर मिठाई बनवण्याची तारीख सुद्धा नाही.या गंभीर बाबीकडे अन्न औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.

दिवाळीत मिठाईसह तयार फराळाला प्रचंड मागणी असते. हे लक्षात घेऊन काही दुकानदारांकडून मिठाईत भेसळीचा मार्ग अवलंबिला जातो. विशेषत: दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. चिवडा किंवा इतर फराळाच्या पदार्थांमध्ये बनावट तिखटाचाही वापर करण्यात येतो. हे लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस मिठाई मिळावी, अन्न पदार्थांमधील भेसळ रोखली जावी, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवश्यक पाऊले उचलण्याची गरज आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!