बुलढाणा (हॅलो बुलढाणा) साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरा आश्रम येथे अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून
येथील वार्ड क्रमांक चार मधील तीन घरे फोडली असून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या गावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून दोन दिवसाआधी लाखोचा ऐवज लंपास केला होता. आता झालेल्या चोरीमध्ये घरासमोरील मोटारसायकल सुध्दा चोरट्यांनी लंपास केली आहे. साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक चार मधील शेख अक्रम शेख कासम , सचिन तानाजी सोळंके , आणि लखन संजय कामे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला . घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सोन्याचा पट्टा १ हजार , मणी १ हजार २०० रुपये , गंठण २५ हजार रुपये , चांदीचे पैजन १ हजार रुपये व इतर ५०० रुपये साहित्य आणि नगदी १२ हजार असा ६७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.शेख अक्रम यांच्यासह तिघांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलिसांनी १७ जून रोजी रात्री अज्ञात आरोपी विरोधात कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅ . बाजीराव खरात करीत आहेत. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने साखरखेर्डा पोलीस करतात तरी काय?असा प्रश्न गावकरी विचारत आहे.