spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ऐन दिवाळीत बंडखोरांचे फटाके! -बंडोबा करतील महायुतीचा खेळखंडोबा? -संजूभाऊ व श्वेताताईंपुढे कडवे आव्हान !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी उफाळून आल्याचे दिसतेय.

विशेषतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघ व चिखली विधानसभा मतदारसंघात कोणते बंडोबा विद्यमान आमदारांच्या राजकारणाचा खेळखंडोबा करतील किंवा स्वतःचा करून घेतील हे सध्या तरी सांगता येत नाहीये.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार व अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध भाजपाचे लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी भाजपाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली असून पक्षश्रेष्ठींनी न दिल्यास अपक्ष म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केल्याने ही बंडखोरी निश्चित मानल्या जात आहे.दरम्यान शिंदे यांनी भाजपाला गलिच्छ समजत असल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप केल्याने त्यांनी देखील भाजपातून शिंदे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार तथा विद्यमान आमदार श्वेता ताई महाले यांच्याविरुद्ध काही उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी चिखलीत भाजपावर दबाव वाढविण्यासाठी उमेदवारी दाखल केल्याचे म्हटले जात आहे. चिखलीत भाजपाचे कट्टर समर्थक विजय पवार यांनी अपक्ष उमेदवारी तर महायुतीतील रिपाई आठवले गटाचे नरहरी गवई यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे श्वेता महालेंसाठी अडचण ठरू शकते.परंतु अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्याला वेळ असल्याने कोण कोण बंडोबा थंड होऊन उमेदवारी मागे घेतात आणि त्यांना महायुतीतील पक्षश्रेष्ठी समजविण्यात यशस्वी होतात हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!