बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा जोर वाढत असून अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर प्रगाढ विश्वास ठेवत काही भाजप कार्यकर्त्यांसह कामगार व युवकांनी प्रवेश घेत महाविकास आघाडीला विजयी करण्याचा निश्चय केला आहे.
चिखली पेंटर संघटनेच्या अनेक कामगारांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
वाढत्या महागाईमुळे व कामगार संघटनांना भेडसावत असलेल्या समस्यांमुळे त्यांनी पक्षात प्रवेश केला. यामध्ये सम्राट पवार, नितीन आराख, सचिन रिंढे, संदीप जाधव, सिद्धार्थ गवई, मनोज लहाने,अमोल निकाळजे, शे साजिद, प्रकाश रिंढे, शे सलीम, विनोद बनकर, शाम पठाडे, अमोल इंगळे, राजु वानखेडे, मनोज जाधव, यांचा समावेश आहे. तसेच अंबाशी येथील युवकांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सत्ताधारी पक्षाला कंटाळून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे युवक म्हणाले.यामध्ये किरण गवई, सुशील गवई, शेख तौफिक, शेख जुबेर, शेख मोहिन, शेख पणन, शुभम पाटील यांचा समावेश आहे.
▪️भाजपा कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश!
चिखली शहरातील गौरक्षणवाडी येथील भाजपच्या काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये पंडितराव सखाराम जेठे, अनीलभाऊ विठ्ठल माने, कैलासभाऊ अविनाश हळकुटे, रविभाऊ अंकुश लष्कर यांचा समावेश असून त्यांनी काँग्रेसला विजयी करण्याचा निश्चय केला आहे.