बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,शिंदे- फडणवीस,अजित पवार सरकारने गलिच्छ राजकारण केल्याचे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले आहे.महाराष्ट्राला त्यांचे राजकारण अमान्य असून ज्या प्रकारे सिनेमात दरोडे टाकणारा टोळ्या असतात त्या प्रकारे हे सरकार लुटारू आहे.परंतु महाविकास आघाडीचे पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे.त्यामुळे आपले काम करीत राहून राहुल बोंद्रे यांच्यासारख्या वजनदार उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी केले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांचा आज नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी जाहीर सभेत खा. वासनिक बोलत होते.
खासदार मुकुल वासनिक पुढे म्हणाले की,राहुल बोंद्रे यांची प्रत्यक्ष क्षेत्रात योगदान आहे.त्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केले आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात सावध पाऊल टाकावे लागेल.येथील राजकारणी लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न करतील.आपले काम करीत राहिलो तर महाविकास आघाडीचा निश्चित विजय होणार असल्याच्या विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी
लढा ..भय..भ्रष्टाचारमुक्त मतदार विधानसभा संघासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून मला साथ द्यावी असे राहुल बोंद्रे यांनी नागरिकांना आवाहन केले.
यावेळी उसके मान्यवर,नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.