बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड चिखली विधानसभा मतदारसंघतून आज अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला असून त्यांचा ताफा थोड्या वेळापूर्वी चिखलीकडे रवाना झाला होता.गायकवाड यांचे चिखली विधानसभा मतदारसंघातील सगेसोयरे व गोतावळा पाहता आणि डॉ. गणेशराव बाहेकर यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कुणाल गायकवाड यांचा विजय सुनिश्चित असल्याचा दावा केला आहे.
आज विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून सातही विधानसभा मतदारसंघात अनेक आश्वासक चेहरे उमेदवारी दाखल केले आहे.यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी तत्पूर्वीस दाखल केली असून त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी अपक्ष म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघात आज नामांकन अर्ज दाखल केला आहे.कुणाल गायकवाड यांच्या समर्थकांनी म्हटले की आमदार संजय गायकवाड यांचा चिखली विधानसभा मतदारसंघात मोठा गोतावळा आहे.कुणाल गायकवाड यांच्या आईचे मामा व नात्यातील डॉ गणेशराव बाहेकर यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय उदयनगर ,पळसखेड व रायपुर सर्कलमध्ये कुणाल गायकवाड यांची मोठी ताकद असून या भागातील छावा संघटनेच्या व शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा विजय सुकर होणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे. दरम्यान कुणाल गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल केली असल्याने भाजपाच्या
उमेदवार श्वेताताई महाले यांना ही निवडणूक अडचणीची जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.




















 

