बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखलीत आरबी पॅटर्न चालणार असल्याचा दावा राहुल बोंद्रेंच्या समर्थकांनी केला असून,बोंद्रे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान चिखलीत ‘पंजाने’ वज्रमूठ आवळली असून काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे आज विराट शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
हजारो शेतकऱ्यांचे, युवकांचे, व्यापाऱ्यांचे,माय माऊलींचे मनातील जनतेच्या मनात रुंजी घालणारे माजी आमदार राहुल बोंद्रे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत.
चिखली मतदारसंघात राहुल बोंद्रे यांचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याने आज विराट शक्ती प्रदर्शन दिसून येणार आहे. दरम्यान विराट सभा व भव्य रॅली देखील संपन्न होणार असून
मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या भव्य सभेकडे नागरिकांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे. राहुल बोंद्रे यांचा विजय निश्चित असल्याचा समर्थकांनी दावा केला आहे.










