बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उबाठाच्या चालत्या गाडीतून वंचितच्या धावत्या गाडीत प्रा. सदानंद माळी बसले खरी परंतु ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी कडून प्रशांत वाघोदे यांना सिट दिल्याने प्रा. माळी ऐवजी आता वाघोदे यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी कडून
प्रा.सदानंद माळींचा पत्ता कट झाला असून वंचितची उमेदवारी प्रशांत वाघोदे यांना देण्यात आली आहे. सदानंद माळी यांना वंचित बहुजन आघाडी कडून बुलढाणा विधानसभा करिता उमेदवारी घोषित करण्यात आली होती. याची सर्वात पहिले ब्रेकिंग बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने प्रकाशित केली होती.पण कार्यकर्त्यांच्या अग्रस्तव ही जागा वाघोदे यांना देण्यात आली आहे.माळींचा पत्ता कट करून वाघोदेंना उमेदवारी देण्यात आली असल्याने वंचित ची सुप्रीम बाळासाहेब आंबेडकर यांची नेमकी खेळी काय ? याबाबत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चर्चा होत आहे.
▪️संविधानवादी जनतेने उमेदवारी दाखल करण्यासाठी उपस्थित राहावे !
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रशांत उत्तम वाघोदे यांचा उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीचे नेते मा.अशोकभाऊ सोनोने, जिल्हा निरीक्षक प्रा.डॉ.धैर्यवर्धनजी पुंडकर, जिल्हाध्यक्ष मा.निलेशभाऊ जाधव, मा.साहेबरावजी तायडे, जि.महासचिव प्रा.विष्णुजी उबाळे, जि. उपाध्यक्ष मा.भीमरावजी शिरसाट, युवा जिल्हाध्यक्ष मा.विशालभाऊ गवई, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष मोहितराजे दामोदर, मोताळा ता.अध्यक्ष मा.समाधानभाऊ डोंगरे, बुलढाणा ता.अध्यक्ष मा.मनोजभाऊ खरात, बुलढाणा शहरध्यक्ष मा.मिलिंदभाऊ वानखडे, शहर महासचिव दिलीपभाऊ राजभोज, विजयभाऊ राऊत तसेच जिल्हा/तालुका/शहर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवार अर्ज भरायचा आहे, तरी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुले-आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते आणि संविधानवादी जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आली आहे.