बुलडाणा (हॅलो बुलढाणा) कुठेही तंबाखू गुटखा खाऊन भिंतीवर थुंकण्याची सवय जाता जात नाही. शासकीय कार्यालयांचे कोपरे अगदी रंगलेले दिसून येतात. अशा 11 थुकरटांवर जिल्हा स्त्री रूग्णालयात 11 जणांवर कारवाई करण्यात आली. यात त्यांच्यावर एक हजार 600 रूपयांचा दंड आकारण्यात आला कोटपा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा स्त्री रूग्णालयात 11 जणांवर कारवाई करण्यात आली. यात त्यांच्यावर एक हजार 600 रूपयांचा दंड आकारण्यात आला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्त्री रुग्णालय आणि परिसरात तंबाखू, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळल्यास त्यांच्यावर कोटपाच्या कलम चार नुसार 11 जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यात 1 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. यासाठी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली.
- Hellobuldana