बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यात शिवसेना फॉर्मात असून शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वाघांची विजयाची डरकाळी फोडली जात आहे. दरम्यान भगवे वादळ आले की काय ? असे आमदार संजय गायकवाड यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जमलेल्या गर्दीवरून दिसत आहे.
सध्या विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिंदे गट शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.त्यांचा एबी फॉर्म त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी तत्पूर्वी मुख्यमंत्री यांच्याकडून स्वीकारला.आज आमदार गायकवाड नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.दरम्यान भव्य सभा सुरू असून या सभेला प्रचंड गर्दी उसळली आहे. समर्थकांसह आलेल्या इच्छुकांमुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.