बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यातील नेत्र तज्ञांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र नेत्र परिषदेवर येथील प्राख्यात नेत्र तज्ञ डॉ. शोण चिंचोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर येथे नेत्र तज्ञांची परिषद भरली असता यावेळी त्यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात आले.
परिषदेचे अध्यक्ष व खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्र नेत्र परिषद राज्यातील नेत्र तज्ञांची नामवंत संघटना मानली जाते. या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम तसेच नेत्रविषयक जनजागृती, माहिती दिली जाते. नवनवीन तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम तसेच जगातील अद्यावत ज्ञान डॉक्टरां पर्यंत पोहोचवण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून केले जाते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहे.त्यामुळे ही परिषद सामान्य जनता व डॉक्टरमधील दुवा मानली जाते. या परिषदेवर नियुक्ती होणे हे देखील सन्मानाचे मानले जाते. बुलढाणा येथील प्राख्यात नेत्रतज्ञ व शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष, विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमामधे सहभागी डॉक्टर शोन चिंचोले यांची निवड कोषाध्यक्षपदी करण्यात आली आहे. डॉक्टर शोण हे जसे नेत्रतज्ञ आहेत तसेच ते समाजसेवी देखील आहेत.बुलढाणा शहरामध्ये विविध सामाजिक चळवळी राबवून त्यांनी विविधतेत एकता जोपासण्याचे काम केले. शहरामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ‘लोकमंच बुलढाणा’ या फोरमचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. लोकमंचाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांनी प्राधान्य दिले. शहराचा सांस्कृतिक चेहरा म्हणून देखील डॉक्टर शोण यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निवडीने स्वागत होत आहे.
यांचीही झाली निवड!
या परिषदेचे अध्यक्षपदी अकोला येथील डॉक्टर थोरात तर सचिव पदी डॉक्टर शहा यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नेत्र परिषदेत 2024 व 2025 या काळात होऊ घातलेल्या सर्व नेत्र परिषदा व कार्यकारणीचे यावेळेस स्वागत करण्यात आले.
चेअरमन सायंटिफिक कमिटी डॉ पियुष बंसल पुणे,उपाध्यक्ष डॉ अनघा हेरूर मुंबई,
नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ अतुल काढणे,
जे सी ओ आर प्रमुख डॉ राजेश जोशी ,
संयुक्त सचिव व संयुक्त खजिनदार डॉ प्रीती कामदार ,डॉ अजय लोहिया छ.सं.नगर
तसेच कार्यकारी सदस्य डॉ.अरुण अडचित्रे ,डॉ कविता डांगरा ,डॉनिखिल गांधी , डॉ प्रफुल डाके, डॉ राधिका परांजपे, डॉक्टर सागर भुईभार, डॉ अमेय कुलकर्णी,डॉ.केतकी, डॉ अनंत भोसले, डॉ सागर भुईभार ,सल्लागारपदी ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर कुरेश मस्कती , डॉ ए ए देशपांडे महाराष्ट्र नेत्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ संतोष भिडे,डॉ संतोष अग्रवाल तसेच डॉ जगदीश बिराजदार ,डॉ पंकज शाहा. नवनियुक्त सर्व महाराष्ट्र नेत्र परिषदेच्या या सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या नेत्र परिषदेमध्ये प्रमुख विषयांवर मांडणी केलेली आहे.
परिषदेचे उपक्रम
संपूर्ण वर्षभर सर्व प्रकारच्या नेत्ररोगांवर होत असलेल्या आजारांबाबतीत जनजागृती कार्यक्रम लेखणी माध्यम, मीडिया व इतर प्रसार माध्यमांच्या द्वारे सुद्धा या कार्यक्रमांचे रूपरेषा मांडण्यात आली आहे.जनजागृती कार्यक्रमांमध्ये विशेषतः बाल नेत्ररोग , मायोपिया म्हणजेच दृष्टी दोष निवारण,शेती व्यवसायामध्ये होत असलेल्या नेत्रावरती इजा व होऊ घातलेल्या दृष्टीदोषावरती मांडणी,
मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे होत असलेल्या मागील पडद्यांवरील हानी,कंप्यूटर व मोबाईल मुळे होत असलेल्या दृष्टीदोष व त्यावरील आजारांवरील इलाज व जनजागृती तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध नेत्र परिषदेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणाऱ्या या जनजागृती कार्यक्रमांमध्ये सर्व माध्यमे, सरकारी व इतर गैरसरकारी सामाजिक संस्था यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा परिषदेचा मानस आहे.