देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा बायपास सातेफळ चौफुलीवर आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची बातमी समोर आली आहे.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.परंतु देऊळगाव राजात आचारसंहिता भंग झाल्याची दिसून येत आहे.एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे.परंतु देऊळगाव राजा येथील या प्रकरणी काय कार्यवाही होते याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.