बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रक्ताचे पाणी करून वाढविलेल्या सोयाबीन पिकाला अखेर जळावू वृत्तीचे लोक जर अग्नीच्या हवाली करीत असेल तर ‘ये आग कब बुझेगी?’असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
किन्होळा येथील 15 एकरातील 5 शेतकऱ्यांचे सोयाबीन जळून खाक झाले आहे. 9 ते 10 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी यंदा पदरमोड करून नगदी पीक असलेले सोयाबीन हातावरील फोडाप्रमाणे वागविले.आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन सोंगण्याची वेळ आली होती. परंतू बळीराजांनी सोंगलेल्या या सोयाबीन सुडीला अज्ञात व्यक्तींनी सूड भावनेने पेटवून टाकले. तब्बल 15 एकरातील पाच शेतकऱ्यांची सोयाबीन जळून कोळसा झाला आहे.याबाबत पोलीस तपास करीत असून लवकरच हे जळके जेलाआड होणार असल्याची माहिती आहे. शिवाय सरकारने सोयाबीनला योग्य भाव न दिल्याने यंदाची दिवाळी अंधारात चाचपडत जाणारी आहे.