बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोणार – मेहकर विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेने कडून इच्छुक निष्ठावंत उमेदवार होते.परंतु निष्ठावंतांच्या पदरी निराशा पडून आत्ता शिवसेनेत दाखल झालेल्या आणि मंत्रालय सचिव पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या सिद्धार्थ खरातांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली आहे.परंतु स्थानिक उमेदवाराला येथे पसंती असून आमदार संजय रायमुलकर यांच्यासोबत लढत असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे संकेत आहेत. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे एक ते दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्यांच्या समर्थकांनी अपक्ष लढावे अशी मागणी केली आहे.
मेहकर विधानसभेतील तिकिटाची रणधुमाळी संपली जरी असली तरी मेहकर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिक आणि एकनिष्ठ काम करणारे शिवसेना संलग्नित युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे यांच्या भूमिकेकडे मेहकरवासियांचे लक्ष लागले आहे.
कारण मेहकर मध्ये ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्याच्या पाठीमागे प्रकाश डोंगरे हे खंबीरपणे उभे राहिले. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम तसेच शिवसेना प्रामाणिकपणे वाढवण्याचे काम प्रकाश डोंगरे यांनी केले आहे. मेहकर विधानसभेत प्रकाश डोंगरे यांना उमेदवारी जरी मिळाली नसली तरी मेहकर मध्ये आमदार कोण होणार ही भूमिका प्रकाश डोंगरे यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याची व तेच किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा आता रंगत आहे.