spot_img
spot_img

बहिणीच्या लग्नाची शिदोरी आणण्यासाठी जात असलेल्या भावावर काळाने घातला घात!रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आढळून एक ठार तर एक जखमी!

नांदुरा (हॅलो बुलडाणा)रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाले आहे ही घटना दि 17 जून रोजी सकाळच्या सुमारास नांदुरा मलकापूर रोडवर घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वडनेर भोलजी येथील टाटा सर्विस सेंटर समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकी आदळली या भीषण अपघातात एक ठार तर एक जखमी झाले आहे ही घटना 17 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या समोर घडली आहे. तक्रार कर्ता प्रशांत सखाराम लाहुडकर रा.शेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रज्वल दशरथ काळे वय 20 वर्षीय रा दसनूर ता रावेर व शुभम मुकुटराव निळे रा रखेड ता शेगाव हे दोघे बहिणीच्या लग्नाची शिदोरी अन्याय करता वाघूळला निघाले होते यावेळी नांदुऱ्यावरून मलकापूरकडे जात असताना आरजे 39 जीए १६०२ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक निष्काळजीपणे रस्त्यावर उभे करून इतर वाहनांना वापरण्याकरिता धोका व अडथळा किंवा कोणत्याही सूचनेचे फलक न लावता किंवा खुणा रस्त्यावर न लावता उभा केला होता. दरम्यान दुचाकीस्वार ट्रक सुरू असल्याचा भास झाला व त्यामुळे त्याची एम एच 30 ए के 2828 या क्रमांकाची दुचाकी उभ्या ट्रकवर जाऊन आदळली त्यामुळे प्रज्वल दशरथ काळे यांच्या डोक्याला मार लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या शुभम निळे हा जखमी झाला. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकावर विविध कलमानुसार मोटर वाहक कायदा कलम 122/177 खाली गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!