बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यामध्ये तसेच जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकुण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.सध्याच्या पिकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
Ø बुलडाणा जिल्ह्याकरिता खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके – मुंग,उडीद,सोयाबीन, तूर, मका,बाजरी,ज्वारी,भूईमूग व सुर्यफुल.
Ø स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे.
Ø स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
Ø पिक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीचे स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
Ø पिक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पिक स्पर्धेकरिता पात्र राहतील.
Ø पिक स्पर्धामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्ष त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.
Ø प्रवेश शुल्क- सर्वसाधारण गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300/- व आदिवासी गटासाठी 150/-
Ø मुंग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024
Ø सोयाबीन तूर व मका पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31ऑगस्ट 2024
Ø पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,7/12,8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.
Ø पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.
Ø पिक स्पर्धामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील विजेत्या स्पर्धकास ज्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे त्या स्तरावरील त्या क्रमांकाच्या खालचा स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धकास त्याच पिकासाठी पुढील पाच वर्ष स्पर्धक म्हणून बक्षिसासाठी ग्राह्य धरले जाणार नाही तथापि विजेता स्तरावरील त्या क्रमांकाच्या वरील स्तर व क्रमांकाकरीता स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बक्षिसासाठी पात्र राहील.
अधिक माहितीसाठी संबधीत गावाचे कृषि सहाय्यक/ कृषि पर्यवेक्षक/ तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधावा. मुंग व उडीद पिकासाठी 31 जुलै 2024 व सोयाबीन,तूर, मका ज्वारी, बाजरी,भुईमुग व सुर्यफुल या पिकासाठी 31 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये जास्तीत संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री.एम.डी.ढगे यांनी केले आहे.